दिवाळी नंतर मुंबई लाेकल सामान्यांसाठीही सुरू करण्याचा विचार


मुंबई (वृत्तसंस्था) : दिवाळी झाल्यानंतर कोरोनाग्रस्तांचा आलेख खाली आला तर, पंधरवड्यानं मुंबईतली रेल्वे उपनगरी सेवा सर्व सामान्यांसाठीही सुरू करण्याबाबत राज्य सरकार विचार करत आहे. या संदर्भात महापालिकेबरोबर समन्वय साधून कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश ककाणी यांनी दिली.