राज्यातल्या पदवीधर तसंच शिक्षक मतदार संघाच्या ५ जागांसाठी १६८ उमेदवार निवडणूक रिंगणात

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या विधानपरिषदेच्या पदवीधर तसंच शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकांसाठी अर्ज मागे घेण्याची मुदत काल संपली. त्यामुळे या निवडणुकींच चित्र स्पष्ट झालं आहे  विधानपरिषदेच्या ५ मतदारसंघातून आता १६८ उमेदवार निवडणूक लढवत आहेत.

नागपूर विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी भाजपाचे संदीप जोशी आणि कॉंग्रेसचे अभिजीत वंजारी यांच्यासह १९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आता २७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या मतदार संघात भाजपाचे नितीन धांडे आणि शिवसेनेचे श्रीकांत देशपांडे निवडणूक लढवत आहेत.

पुणे पदवीधर मतदार संघात ६२ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. भाजपाचे संग्राम देशमुख आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अरुण लाड निवडणूक रिंगणात आहेत. तर पुणे शिक्षक मतदार संघात कॉंग्रेसचे प्राध्यापक जयंत आसगावकर आणि भाजपाचे जितेंद्र पवार यांच्यासह ३५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ निवडणुकीत आता ३५ उमेदवार रिंगणात आहेत. यामधे भाजपाजे शिरिष बोराळकर आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सतीश चव्हाण यांचा समावेश आहे. या निवडणुकीसाठी  १ डिसेंबरला मतदान, तर ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.