जगभरात कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाही, जागतिक पातळीवर सोने व क्रूडचा वृद्धीचा ट्रेंड
• महेश आनंदा लोंढे
मुंबई: या सप्ताहअखेर, एमसीएक्सवर गोल्ड फ्युचरने चांगली कामगिरी केली. सोन्याने ५०,००० रुपयांची पातळी ओलांडली व ते ५०,३०० रुपये/१० ग्राम या किंमतीवर स्थिरावले. डॉलरचे काहीसे अवमूल्यन झाल्याने ते ४९,५५१ रुपयांवरही आले होते. बायोटेक कंपन्यांकडून लसीच्या चाचण्यांबाबत सकारात्मक बातम्यांना तसेच कोरोना व्हायरससाठी अमेरिकेच्या आर्थिक मदतीच्या चर्चेच्या बातम्यांनाही याचे श्रेय दिले जात आहे. एवढेच नाही तर, निवडून आलेले राष्ट्राध्यक्ष जो बिडेन हे साथीची स्थिती हाताळण्यासाठी प्रयत्न करतील, अशा संकेतांमुळेही पिवळ्या धातूची आठवड्याच्या सुरुवातील चांगली कामगिरी दिसून आली असल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले.
दिवाळीनंतरच्या खरेदीच्या उत्साहामुळेही सोन्याच्या किंमतीवर आणखी परिणाम झाला. स्पॉट गोल्डचे दरही फार कमी नाहीत. ते ५०,१९९ रुपयांवर स्थिरावले. आज सकाळी, कॉन्ट्रॅक्ट जवळपास ०.२४ टक्के उच्चांकी दरानी ५०,४०० रुपयांवर व्यापार करत होते. तथापि, देशांतर्गत बाजारात किंमती काही प्रमाणात अस्थिर राहण्याची शक्यता आहे. एमसीएक्सवर सोन्याचे दर फार समाधानकारक कामगिरी करणार नाहीत.
कच्चे तेल: स्पॉट क्रूडमध्ये कोणताही बदल झालेला दिसून आला नाही. डॉलरचे अवमूल्यन झाल्याने सकारात्मक मार्ग चिन्हे दिसून आली व कच्च्या तेलाचे दर ३,१२४ रुपये प्रति बॅरल एवढे झाले. दरांनी २.०५ टक्क्यांची वृद्धी अनुभवल्यामुळे तेलाच्या दरांना गती मिळाल्याचे दिसते. सध्या तेलाचे दर ३,१९३ रुपये प्रति बॅरल एवढे आहेत.
तेलाचे दर वृद्धीच्या दिशेने असल्यामागील कारणे देताना पुन्हा एकदा ओपेक+ देशांनी पुढील महिन्यात उत्पादन कपातीचा निर्णय घेतल्याचे दिले गेले. नोव्हेंबर महिन्यातील बैठकीत पुढील ३ ते ६ महिन्यात आणखी उत्पादन कपात होण्याची आशा आहे. जागतिक स्तरावर, ब्रेंट क्रूडने ०.४ टक्के उच्चांकाने व्यापार करत ४५.१३ डॉलर प्रति बॅरल असा दर गाठला. तर डब्ल्यूटीआय क्रूडचे दर ०.१ टक्क्यांने वाढून ४२.४६ डॉलर प्रति बॅरलवर स्थिरावले.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.