देशात काल दिवसभरात ४४ हजार ७३९ रुग्ण कोरोनामुक्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल दिवसभरात ४४ हजार ७३९ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. त्यामुळे देशात आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ८३ लाख ३५ हजार १०९ झाली आहे. याबरोबच देशातला कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचा दर वाढून ९३ पूर्णांक ५२ शतांश टक्क्यावर पोचला आहे.

देशात काल ३८ हजार ६१७ नव्या कोरोनाबाधित रुग्णांचीही नोंद झाली. यामुळे देशभरातल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या ८९ लाखापेक्षा जास्त झाली आहे. काल देशभरात ४७४ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

त्यामुळे कोरोनाबळींची एकूण संख्या, १ लाख ३० हजार ९९३ झाली आहे. देशातला कोरोना मृत्यूदर सध्या १ पूर्णांक ४७ शतांश टक्के इतका आहे. सध्या देशभरात, ४ लाख ५३ हजार ४०१ कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत.