१२ वर्षे मुदतीची १ हजार कोटी रुपयांच्या रोखे विक्रीची राज्य सरकारची सूचना


 

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र शासनानं अधिसूचनेद्वारे शासनाच्या १२ वर्ष मुदतीच्या एकूण १ हजार कोटी रुपयांच्या रोखे विक्रीला मान्यता दिली आहे. विक्री शासनाच्या अधिसूचनेमध्ये नमूद केलेल्या अटी आणि शर्तीच्या अधीन राहून केली जाईल.

तसंच राज्य शासनाच्या १६ मे, २०१९ च्या सुधारित सर्वसाधारण अधिसूचनेमध्ये नमूद केलेल्या आणि वेळोवेळी सुधारित केलेल्या शर्ती आणि अटींच्या अधीन राहील.