कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिवाळीच्या काळात फटाके नफोडण्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं आवाहन


मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणू संसर्ग  हा श्वसनसंस्थेवर परिणाम करत असल्यानेप्रदुषणांने संसर्ग वाढू शकतो त्यामुळे दिवाळीच्या  काळात फटाके नफोडण्याचं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेयांनी केलं आहे. आज दुपारी दीड वाजता समाजमाध्यमांवरून जनतेशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. दिवाळीच्या शुभेच्छा देत आतापर्यंत सर्व सण घरातल्या घरात संयमानेसाजरे केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. असे सांगत त्यांनी   केले.  जनतेने फटाक्यांवरील  बंदी आपणहून पाळावी असे मुख्यमंत्री म्हणाले. परिस्थिती आटोक्यात आल्याची आकडेवारी सांगत आतापर्यंत कमावलेले धुरातगमावूया नको असं आवाहन त्यांनी केलं.

  ‘माझे  कुटुंब माझी जबाबदारी’ यासर्वेक्षणाचा   कोविडची आकडेवारी आटोक्यात येण्यातमोठा हातभार लागल्याचं सांगून या सर्वेक्षणाचं कामकेलेल्या साठ हजार टीम्सचे मुख्यमंत्र्यांनी आभार मानले. या सर्वेक्षणामुळे इतरहीआजारांची व्याप्ती लक्षात आल्याचं त्यांनी सांगितलं. दिवाळीनंतर पूर्ण खबरदारी घेउन आठवी ते दहावीचे वर्ग उघडण्याचीग्वाही त्यांनी दिली. सिनेमागृहे, नाट्यगृहे उघडली, लोकलबाबत  केंद्राशी बोलणी सुरू आहेत असे त्यांनी सांगितले. 

दिवाळीनंतरचीपरिस्थिती बघून देवळे, प्रार्थनास्थळेही उघडण्याचा विचारकरू असे मुख्यमंत्री म्हणाले.   गेल्या सात आठ महिन्यात  केलेल्या विकासकामांचाही मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला.  यामध्ये त्यांनी शिवभोजनाची वाढवलेली व्याप्ती , जूनमध्ये केलेले 17 कोटींचे सामंजस्य करार तरगेल्या आठवड्यातल्या 35 कोटींचे करार यांचा उल्लेख केला.  अतिवृष्टी, वादळ याने केलेल्या नुकसानीचाही त्यांनी आढावाघेतला. अश्या संकटांसाठी दहा हजार कोटींची तरतूद केल्याचा उल्लेख त्यांनी केला.

राज्य सरकार आणि जनतेत विश्वासाचा बंध निर्माण झाला आहे असा विश्वासव्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी मास्क वापरा, अंतराचा नियम पाळा, वारंवार हात धुवा यात्रिसूत्रीचे पालन करण्याचा आग्रह करत फटाके टाळण्याचे आवाहन केले