पुणे :महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या सन २०२०-२०२१ या आर्थिक वर्षातील जिल्ह्याकरिता २०% बीज भांडवल योजनेचे ६० व थेट कर्ज योजनेचे १०० भौतिक उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. २०% बीज भांडवल योजना ही राष्ट्रीयकृत बँकांमार्फत राबवली जाते. यासाठी प्रकल्प मर्यादा ५ लाख आहे. यात महामंडळाचा हिस्सा २०% व बँकेचा हिस्सा ७५% असून लाभार्थ्यांचा सहभाग ५% आहे. कर्ज परतफेडीचा कालावधी ५ वर्षे आहे. अर्जदाराचे वय १८ ते ५० वर्ष व संपूर्ण कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाखाच्या आत असावी. थेट कर्ज योजना महामंडळामार्फत राबवली जाते. त्याची मर्यादा ५ लाख आहे.
या योजनेत नियमित कर्जफेड करणाऱ्यांना व्याज आकारले जात नाही. थकीत राहिल्यात ४% व्याज आकारले जाते. अर्जदाराचे वय १८ ते ५५ वर्षे आणि सिबील क्रेडिट स्कोर किमान ५०० इतका असावा. संपूर्ण कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १ लाख पर्यंत असावे. शासनाच्या कौशल्य विकासामार्फत तसेच शासकीय/ निमशासकीय संस्थांमधून तांत्रिक प्रशिक्षण घेतले त्यांना प्राधान्य दिले जाणार आहे.
अर्जासाठी व अधिक माहितीसाठी ओबीसी महामंडळ जिल्हा कार्यालयात संपर्क साधावा. अशी माहिती महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे सदस्य सचिव श्री.डी.ए. काकडे यांनी साप्ताहिक एकच ध्येयचे वार्ताहर यांना दिली.
जिल्हा कार्यालयास संपर्क करण्यासाठी पत्ता व फोन नंबर पुढीलप्रमाणे
पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, इमारत क्रमांक बी, सर्वे नंबर १०४/१०५ मेन्टल हॉस्पिटल कॉर्नर, विश्रांतवाडी, येरवडा, पुणे, ४११००६
फोन नंबर : ०२०-२९५२३०५९.