टपाल खात्याने ८२ देशांमध्ये फराळ पाठवण्यासाठी सेवा उपलब्ध करुन दिली


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विदेशात राहणाऱ्या आप्तजनांना दिवाळीचा फराळ पाठवण्यासाठी टपाल खात्यानं ८२ देशांमध्ये सेवा उपलब्ध करुन दिली आहे. मात्र संबंधित देशात फराळाचं टपाल पोहोचण्याआधी त्या ठिकाणी टाळेबंदी जाहीर झाली, तर हे टपाल प्रेषकांना परत पाठवण्यात येईल, अशी हमी टपाल खात्यानं दिली आहे.