पीक कर्ज वितरणात सेंट्रल बँकने टाळाटाळ केल्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आरोपमुंबई (वृत्तसंस्था) : परभणी जिल्ह्यातल्या दत्तक गावांमधल्या शेतक-यांना पीक कर्ज वितरण करण्यात सेंट्रल बँक टाळाटाळ करत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केला असून, या विरोधात आपला निषेध नोंदवण्यासाठी संघटनेच्या पदाधिका-यांनी काल बँकेच्या व्यवस्थापकांना मारहाण केली.पीक कर्ज वितरणात दत्तक गावांबरोबर भेदभाव होत असून, कर्ज मंजुरीसाठी दलालांचा वापर होत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी  केला.


या प्रकरणी सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक आलोककुमार प्रसाद यांनी नवामोंढा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केल्याचं पोलिसांनी सांगितलं.