केंद्र सरकारने वायू गुणवत्ता सुधारण्यासाठी १५ राज्यांना २ हजार २०० कोटी रुपये केले वितरीत


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहा लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये वायू गुणवत्ता सुधारण्यासाठी केंद्र सरकारनं महाराष्ट्रासह १५ राज्यांना पहिल्या टप्प्यात २ हजार २०० कोटी रुपये वितरीत केले आहेत. पंधराव्या वित्त आयोगाच्या शिफारशीवरुन हा निधी जारी केला आहे.

दहा लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांची क्षमता वाढवणं आणि वायू गुणवत्ता सुधारण्यासाठी उपाययोजना करण्याकरता या निधीचा उपयोग होईल, असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे.

महाराष्ट्रासह, आंध्र प्रदेश, गुजरात, झारखंड, कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांचा यामध्ये समावेश आहे. महाराष्ट्राला एकूण निधीपैकी ३९६ कोटी रुपये दिले आहेत.  १५ राज्यांना २ हजार २०० कोटी रुपये केले वितरीत