चारही नगरसेवकांच्या प्रयत्नातून प्रभाग क्रमांक 13 मध्ये हा ट्रेंड सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ


निगडी : प्रभाग क्रमांक 13 मध्ये असलेल्या सेक्टर नं. 22 मधील मूलभूत कामे गेल्या 4 वर्षात पूर्ण करण्यास अपयशी ठरलेल्या नगरसेवकांना थकित कामांबाबत जाब विचारण्यासाठी व एखादे किरकोळ काम करून चारही नगरसेवकांच्या प्रयत्नातून काम झाले, असा संदेश देत स्वतःच आपले आभार व्यक्त करत असलेल्या नगरसेवकांना त्रस्थ होऊन, उपहासात्मक हॅशटॅग चारही नगरसेवकांच्या प्रयत्नातून हा ट्रेंड सोशल साईडवर चालवण्याचे आवाहन लढा यूथ मूव्हमेंट कडून करण्यात आले होते.


गेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग पद्धतीचे तंत्र अवलंबिल्याने एका प्रभागाला चार नगरसेवक अशी योजना आखण्यात आली होती. त्यामुळे से. 22 ला यमुनानगर निगडी गावठाण यासारखे विकसित वॉर्ड जोडण्यात आले होते. त्यामुळे नगरसेवक विकसित भागातच काम करण्यासाठी मग्न राहिले असल्याने, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत से. 22 मध्ये अजूनही मूलभूत सुविधांसाठीच झगडावे लागत आहे. त्यामुळे विकास कामांची अपेक्षा कशी करावी असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे से. नं. 22 कडे नगरसेवकांचे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचे लढा यूथ मूव्हमेंट अध्यक्षचे प्रमोद क्षिरसागर यांनी म्हंटले आहे.


हॉस्पिटलमधील सोईसुविधा वाढविण्याचे काम व त्याचा नामविस्ताराचा प्रश्न, राजरोसपणे सुरू असलेले अवैध धंदे, स्वच्छतेचा अभाव, वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे स्वतंत्र पोलिस चौकीचा प्रश्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत प्रवेशद्वाराचे 2 वर्षापासुन रेंगाळलेले काम, या भागात एकही उद्यान नाही, व्यायामशाळा नाही, झोपडपट्टीमध्ये पाऊस काळात घरांमधे शिरलेले पाणी काढायचे ढोंग नगरसेवक करतात, पण त्यासंबंधी उपाययोजना केल्या जात नाहीत व त्यांच्यासाठी शौचालयाची ही सुविधा नाही. सदरच्या ट्रेंडच्या माध्यामातून अनेक प्रश्ण नागरिकांकडून उपस्थित झाले आहेत. या भागातील नागरिक शेकडोच्या संख्येने या सोशल मीडियाच्या ट्रेंडमध्ये सहभागी होऊन नगरसेवकांना प्रश्न विचारात आहेत.


सदरच्या ट्रेंडमध्ये नागरिकांना सहभागी होण्यासाठी "लढा यूथ मूव्हमेंट"चे भैया ठोकळ, अमित गोरे, बुद्धभूषण अहिरे, सिद्धार्थ मोरे, समाधान कांबळे, संदीप माने, राकेश माने, आप्पा कांबळे, गौतम कांबळे, राष्ट्रतेज सवई, आदींनी प्रयत्न केले आहेत.


Popular posts
कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर 40 हून अधिक लसांवर काम चालू असून, अद्याप कोणीही पुढील टप्प्यात पोहोचलेले नाही : आयसीएमआर
Image
अमेरिकी ट्रेझरी उत्पन्न वाढल्याने गेल्या आठवड्यात स्पॉट गोल्डचे दर १% नी घसरले
Image
सफाई कामगारांच्या पाल्यांना वारसा हक्क नियमानुसार शासकीय सेवेत सामावून घेण्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचे निर्देश
Image
ब्रिटनहून येणाऱ्या- जाणाऱ्या विमान वाहतुकीवर ७ जानेवारीपर्यंत निर्बंध
Image
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा भांडार व शिक्षण विभाग म्हणजे "उंदराला मांजर साक्ष" ; सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांचा आरोप
Image