फटाके दुकानापासून 100 मीटरच्या परिसरात फटाके उडविण्यास मनाई


पुणे : सार्वजनिक सुरक्षेच्यादृष्टीने शोभेच्या दारू आणि फटाके व साठा केलेल्या दुकानापासून 100 मीटर परिसरात कोणीही धुम्रपान करु नये तसेच शोभेच्या दारु आणि फटाके व साठा केलेल्या दुकानापासून 100 मीटर परिसरात कोणत्याही प्रकारचे दारू काम करु नये, फटाके उडवू नयेत तसेच शोभेच्या दारुचे रॉकेट परिक्षणासाठी उडवू नयेत, असे आदेश संतोषकुमार देशमुख, उपविभागीय दंडाधिकारी, पुणे यांनी जारी केले आहेत.


हे आदेश शिरुर तालुक्याच्या ग्रामीण भागास (पोलीस आयुक्त पुणे शहर यांचे कार्यक्षेत्राव्यतिरिक्त) दिनांक 18 नोव्हेंबर 2020 पर्यंत लागू राहतील. वरील आदेश मुंबई पोलीस कायदा 1951 च्या नियम 33 (1) (ओ)(यु) अन्वये निर्गमित करण्यात आले असून आदेशाचा भंग करणारी व्यक्ती मुंबई पोलीस कायदा 1951 च्या कलम 131 नुसार शिक्षेस पात्र राहील.