नाशिक जिल्ह्यातल्या बाजार समित्यांमध्ये आजही कांद्याच्या भावात घसरण


मुंबई (वृत्तसंस्था):नाशिक जिल्ह्यातल्या बाजार समित्यांमध्ये आज सकाळच्या सत्रात देखील कांद्याच्या भावात घसरण झाली.

कांद्याची प्रमुख बाजारपेठ असलेल्या लासलगाव बाजार समितीच्या आवारात सकाळच्या सत्रात सुमारे ६०० रुपयांनी भाव घसरले. सकाळी उन्हाळ कांद्याची आवक १७ हजार ६९० क्विंटल तर लाल कांदा ८० क्विंटल झाली.

उन्हाळ कांद्याला किमान सरासरी चार हजार रुपये तर लाल कांद्यालाही साधारणता इतकाच भाव मिळाला.