‘विना मास्क’ वावरणा-यांना २०० रुपये दंड


मुंबई (वृत्तसंस्था) : सार्वजनिक ठिकाणी ‘विना मास्क’ वावरणा-यांना बृहन्मुंबई महानगरपालिका २०० रुपये दंड आकारत आहे. ही दंडात्मक कारवाई अधिक तीव्र करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिले आहेत. ही कारवाई बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी मुंबई पोलिस दल, वाहतूक पोलिस यांच्यासमवेत संयुक्त कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी महापालिकेच्या सर्व २४ विभाग कार्यालयांना दिले आहेत..


महापालिका आयुक्त श्री. इक्बाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनात महापालिकेच्या अति वरिष्ठ अधिका-यांची एक विशेष बैठक 'दूरदृश्य  प्रणाली’द्वारे आज आयोजित केली होती. या बैठकीत ते बोलत होते.