प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्टॅच्यू ऑफ युनिटी परिसरात जंगल सफारी प्रकल्पाचे लोकार्पण


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमध्ये नर्मदा जिल्ह्यातल्या केवाडिया इथल्या स्टॅच्यू ऑफ युनिटी परिसरात जंगल सफारी प्रकल्पाचे लोकार्पण केले. या प्रकल्पाला सरदार पटेल झूलॉजिकल पार्क असे नाव दिले असून हा प्रकल्प विक्रमी वेळेत पूर्ण केला आहे.


३७५ एकर जमिनीवर उभारलेल्या या प्रकल्पात सात वेगवेगळे विभाग आहेत. त्यात जगभरातले अकराशे विविध जातींचे पक्षी आणि शंभर वेगळ्या जातीचे प्राणी पाहायला मिळणार आहेत. प्रधानमंत्र्यांनी आज गुजरातमध्ये आरोग्य वन आणि आरोग्य कुटीर प्रकल्पाचेही लोकार्पण केले.

ते दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर असून उद्या ते भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना त्यांच्या १४५ जयंतीनिमित्त आदरांजली वाहणार आहेत. या वेळी ते स्टॅच्यू ऑफ युनिटी जवळ राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त एकता परेडमध्ये सहभागी होणार आहेत.

Popular posts
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image