अतिरिक्त प्रोत्साहनपर मदतीच्या अपेक्षांमुळे सोन्याच्या दरात घसरण


मुंबई : अमेरिकेकडून अतिरिक्त प्रोत्साहनपर मदतीच्या अपेक्षांमुळे सोन्याच्या दरात घसारा झाली तर बेस मेटल आणि कच्च्या तेलाच्या दरांना आधार मिळाला. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा झाल्यामुळेही सोन्याचे दर कमी झाले. अतिरिक्त कोरोना निधीमुळे कच्च्या तेलाच्या दरांना आधार मिळाला तर मागणीतील घसरणीमुळे त्यातील नफ्यावर मर्यादा आल्या. चीनमधील दीर्घकालीन सप्ताह सुटीमुळे औद्योगिक धातूंच्या दरांतील वृद्धीवर मर्यादा आल्या असल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले.


सोने: डॉलरचे मूल्य वधारत असल्याने स्पॉट गोल्डचे दर १.८७% नी घसरले व ते १८७७ डॉलर प्रति औसांवर स्थिरावले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मागील आठवड्यात कोरोनाचे निदान झाल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा झाली. त्यामुळे सोन्याचे दर आणखी खाली आले.


महागाई आणि चलन अवमूल्यनाच्या स्थितीत सोने हा मोठा अडथळा ठरू शकतो. त्यामुळे हाऊस स्पीकर नॅन्सी पॅलोसी आणि कोषाध्यक्ष सचिव स्टीव्हन मुनचिन हे दोन्ही बाजूंतील दरी सांधण्याचा प्रयत्न करत असल्याने सोन्याच्या किंमती खाली घसरल्या. त्यामुळे गुंतवमूकदारांना आणखी प्रोत्साहनपर मदतीची अपेक्षा होती. चीनच्या मजबूत औद्योगिक वृद्धीमुळे सोन्याच्या दरातील वाढीवर मर्यादा आल्या. सप्टेंबर २०२० मध्ये चीनच्या वाढीव औद्योगिक कामकाजामुळे गुंतवणूकदारांच्या जोखीमीच भूक वाढली व परिणामी परदेशी मागणीतही सुधारणा दिसून आली.


पुढील निवडणुका होईपर्यंत अमेरिकी अर्थव्यवस्थेला आधार देण्यासाठी अतिरिक्त मदतीच्या विधेयकाबद्दल चर्चा डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवली. यामुळे सोन्याचे दर आणखी कमी होण्याची शक्यता आहे.


कच्चे तेल: राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा झाल्यानंतर अमेरिकेकडून कोरोना मदतीची अपेक्षा आणि गुंतवणुकादारंमधील आशावाद यामुळे डब्ल्यूटीआय क्रूडचे दर ३.७ टक्क्यांनी वाढले व ते ४०.७ डॉलर प्रति बॅरलवर स्थिरावले. डेल्टा चक्रिवादळ अमेरिकेच्या खाडीजवळ आले असून यामुळे अनेक उर्जा कंपन्या बंद आहेत. परिणामी कच्च्या तेलाच्या किंमतींना आणखी आधार मिळाला.


वेतन चर्चा अपयशी ठरल्यामुळे संपाला चालना मिळाली. परिणामी सिक्स नॉर्वेजियन ऑफशोअर तेल व वायू क्षेत्र बंद आहेत. अनेक कामगारांनी संपात सहभाग घेतल्याने ३३०,००० बॅरल उत्पादनाची जोखीम आहे. परिणामी तेलाचे दर वाढले. कोव्हिड-१९ विषाणू संसर्गाची नवी लाट आणि लॉकडाऊनच्या दुसऱ्या फेरीच्या चिंतेने कच्च्या तेलाच्या किंमतीबाबत खबरदारी दिसून आली. आजच्या सत्रात तेलाचे दर फारसे सुधारणार नाहीत, असा अंदाज आहे.


बेस मेटल्स: अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा झाल्याच्या बातमीने तसेच अमेरिकेकडून अतिरिक्त प्रोत्साहन मदतीच्या अपेक्षांमुळे बेस मेटल हिरव्या रंगात स्थिरावले. कोव्हिड-१९ च्या दुसऱ्या लाटेबाबतच्या चिंतेमुळे औद्योगिक धातूंच्या दराबाबत सावधगिरी बाळगली जात आहे. तसेच चीनच्या दीर्घ सप्ताह सुटीमुळेही तेलाची मागणी घटली. परिणामी वृद्धीवर मर्यादा आल्या. सप्टेंबर २०२० मध्ये चीनच्या औद्योगिक कामकाजाला गती मिळाली व विदेशी मागणीत वाढ झाली. तसेच मदतीने प्रेरित पायाभूत सुविधांमध्येही वृद्धी दिसून आली. नॅशनल ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्स रिपोर्टनुसार, चीनच्या अधिकृत मॅन्युफॅक्चरिंग परचेसिंग मॅनेजर्स निर्देशांक सप्टेंबर २०२० मद्ये ५१.५ होता.


तांबे: कोव्हिड-१० च्या वाढत्या प्रसारामुळे लाल धातूंच्या अर्थकारणावर नकारात्मक परिणाम झाला. परिणामी एलएमई कॉपरचे दर ०.०२% नी वाढले व त्यांनी ६५३० डॉलर प्रति टनांवर विश्रांती घेतली. तथापि, चिली खाणींमधील कामगार वाटाघाटींमध्ये २.८ दशलक्ष टन निर्मितीची क्षमता आहे. त्यामुळे तांब्याच्या दरांना आधार मिळाला. आजच्या सत्रात एमसीएक्सवर तांब्याचे दर घसरण्याची शक्यता आहे.


Popular posts
कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर 40 हून अधिक लसांवर काम चालू असून, अद्याप कोणीही पुढील टप्प्यात पोहोचलेले नाही : आयसीएमआर
Image
अमेरिकी ट्रेझरी उत्पन्न वाढल्याने गेल्या आठवड्यात स्पॉट गोल्डचे दर १% नी घसरले
Image
सफाई कामगारांच्या पाल्यांना वारसा हक्क नियमानुसार शासकीय सेवेत सामावून घेण्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचे निर्देश
Image
ब्रिटनहून येणाऱ्या- जाणाऱ्या विमान वाहतुकीवर ७ जानेवारीपर्यंत निर्बंध
Image
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा भांडार व शिक्षण विभाग म्हणजे "उंदराला मांजर साक्ष" ; सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांचा आरोप
Image