राज्यात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेले निर्बंध ३० नोव्हेंबरपर्यंत लागू राहणार


मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेले निर्बंध ३० नोव्हेंबर २०२० मध्यरात्री पर्यंत लागू राहणार आहे. या दरम्यान सर्व मार्गदर्शक सूचनांची कठोर अंमलबजावणी होणार आहे.

वेळोवेळी परवानगी देण्यात आलेल्या बाबी यापुढेही सुरू राहतील, असं राज्य सरकारतर्फे जारी करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे.

धार्मिक स्थळे, मॉल्स, चित्रपटगृह आदींबाबतचे नियम जैसे थे राहतील.