रेल्वेतर्फे सर्व विभागांमध्ये ‘मेरी सहेली’ हे अभियान सुरू


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महिलांना सुरक्षित प्रवास करता यावा यासाठी रेल्वेने सर्व विभागांमध्ये ‘मेरी सहेली’ हे अभियान सुरू केले आहे. संपूर्ण प्रवासात महिलांना सुरक्षा प्रदान करणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे असे रेल्वे मंत्रालयाने सांगितले.

गेल्या सप्टेंबर पासून दक्षिण पूर्व रेल्वे विभागान सुरू केलेला हा महत्वाकांक्षी उपक्रम आता रेल्वेच्या सर्व विभागांमध्ये १७ ऑक्टोबर पासून लागू करण्यात आला आहे. सुरक्षा हेल्पलाइन १८२ हेल्पलाइन आणि जी आर पी हेल्पलाइन क्रमांक १५१२ याद्वारे महिलांना सुरक्षा पथकाशी संपर्कात राहता येईल.


Popular posts
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image