फ्रेंच खुल्या टेनिसमध्ये पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत राफेल नदाल आणि नोवाक जोकोविच आमने सामने


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : फ्रेंच खुल्या टेनिसमध्ये आज पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत राफेल नदालची लढत नोवाक जोकोविचशी होईल. उपांत्यफेरीत नदाल यानं दिएगो श्वार्ट्जमन याचं तर जोकोविचने स्टेफानोस त्सित्सिपास याचा पराभव केला.

12 वेळा फ्रेंच खुल्या स्पर्धेचा विजेता राहिलेल्या नदालला ही स्पर्धा जिंकून 20 ग्रँड स्लॅम जेतेपदाच्या रॉजर फेडररच्या विक्रमाशी बरोबरी करण्याची संधी आहे. तर महिलांच्या गटात पोलंडच्या ईगा श्वांतेक हिनं अमेरिकेच्या सोफिया केनीन हिचा 6-4 , 6-1 असा पराभव करत विजेतेपद पटकावलं.