कोविड-१९ विरोधातल्या लढाईसाठी पुढचे तीन महिने अतिशय महत्त्वपूर्ण आणि निर्णायक असे केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ.हर्षवर्धन यांचं प्रतिपादन


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड-१९ आजाराविरोधात लढाईसाठी येणारे तीन महिने अतिशय महत्त्वपूर्ण आणि निर्णायक असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ.हर्षवर्धन यांनी म्हटलं आहे.

उत्तर प्रदेशमधल्या आरोग्य अधिकाऱ्यांशी दूरदृष्यसंवाद प्रणालीचा माध्यमातून संवाद साधताना ते बोलत होते. जर येत्या उत्सवाच्या काळात आणि हिवाळा ऋतूमध्ये या आजाराविरोधात पुरेशी खबरदारी आणि उपाययोजना केल्या तर आपण या लढाईत चांगल्या स्थितीमध्ये असू असा विश्वासही हर्षवर्धन यांनी व्यक्त केला.

तपासणी, पाठपुरावा आणि उपचार या प्रणालीचा सातत्याने उपयोग करण्याचा सल्लाही त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिला.तसंच अगदी साध्या खबरदारीच्या उपायांवर अधिक भर दिल्यास या आजाराविरोधातल्या लढाईला मोठं बळ मिळतं असंही डॉ.हर्षवर्धन यावेळी म्हणाले.