सामाजिक जाणिवेतून उल्लेखनीय काम केलेल्या पोलीस दलातील स्त्री शक्तीचा सन्मान
मुंबई : नवरात्र म्हणजे नऊ दिवस चालणारा सृजनाचा उत्सव. कोरोनाच्या लढ्यात आमच्या पोलीस दलातील स्त्रीशक्तीने कर्तव्यापलीकडे जाऊन सामाजिक जाणिवेतून उल्लेखनीय काम केले आहे. अशा स्त्री शक्तीचा आम्हाला अभिमान असल्याच्या भावना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केल्या.
गृहमंत्री श्री. देशमुख पुढे म्हणाले, सामाजिक भान ठेवून कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस दलातील स्त्री शक्तीची इतरांना ओळख करून देत त्यांचा सन्मान व गौरव करण्याचा प्रयत्न करत आहोत. शक्तीचे, बुद्धीचे, नीतीचे, भक्ती-शक्ती व कृषी संस्कृतीचे प्रतीक असणारे नवरात्रीचे मंगल पर्व सुरू असताना महाराष्ट्र पोलीस दलातील स्त्रीशक्तीच्या कार्याचा यथोचित गौरव करणे मला गरजेचे वाटते. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये स्त्रीशक्ती अनेक प्रकारे समाजाप्रती आपली बांधिलकी जपत आहेत.
गर्भवती व बाळाचा जीव वाचवणारी आरती राऊत
रायगड पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या महिला पोलीस नाईक आरती राऊत यांनी श्रीवर्धन येथे बंदोबस्तावर जात असताना वाशी-तळा गावाजवळ वादळात अडकलेल्या प्रसुती वेदना होत असणाऱ्या गर्भवती महिलेला वाटेतील अडथळे दूर करुन रुग्णालयात पोहोचविले. राऊत यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तत्काळ मदत केल्याने महिला व बाळाला जीवनदान मिळाले. कर्तव्यापलीकडे जाऊन सामाजिक जाणिवेतून राऊत यांनी केलेल्या मदतीमुळे वर्दीची शान उंचावली आहे. पोलीस दलाचा कुटुंबप्रमुख म्हणून राऊत यांच्या कार्याचा मला अभिमान वाटत असल्याचे गृहमंत्री श्री देशमुख म्हणाले.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.