देशातल्या 6 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांकडून 69 लाख टनांहून अधिक धान पिकाची खरेदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या सुरू असलेल्या खरीप विपणन हंगामात सरकारनं आतापर्यंत देशातल्या 6 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांकून 69 लाख टनांच्या वर धान पिकाची खरेदी केली आहे. भारतीय अन्न महामंडळासह इतर सरकारी संस्थांनी विविध राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांतून धान पिकाची किमान हमी भावानं खरेदी केली आहे, अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयानं दिली आहे.

आतापर्यंत खरेदी झालेल्या धान पिकाची एकंदर किंमत 13 हजार 128 कोटी रुपयांहून अधिक आहे. धान पिकाखेरीज 41 लाख टन डाळी आणि तेलबियांचीही सरकारमार्फत महाराष्ट्रासह इतर काही राज्यांतून खरेदी करण्यात आल्याचं कृषी विभागानं म्हटलं आहे.


Popular posts
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image