उत्तर प्रदेश हाथरस हत्याकांड प्रकरणातील नराधमांना तात्काळ फाशी द्या - प्रमोद क्षिरसागर


पिंपरी : उत्तर प्रदेश, हाथरस याठिकाणी अनुसूचित जाती प्रवर्गाच्या मनीषा वाल्मिकी नावाच्या 19 वर्षीय तरूणीवर मारहाण करून 19 सप्टेंबर रोजी सामूहिक बलात्कार करण्यात आला. तिने याची कुठेही वाच्यता करू नये म्हणून तिची जीभ देखील या नराधमांनी छाटली होती. उपचारादरम्यान दिनांक 29 सप्टेंबर रोजी तिचा मृत्यू झालेला आहे. या अमानवीय घटनेचा लढा यूथ मूव्हमेंटकडून तीव्र निदर्शने करून निषेध नोंदवण्यात आला.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत निगडी आझाद चौक याठिकाणी भागातील नागरिक व सामाजिक कार्यकर्ते, या अमानवीय निंदनीय घटनेचा व अशा नीच कृत्य करणार्‍या नराधमांचा निषेध नोंदविण्यासाठी जमले होते. यावेळी "उत्तर प्रदेशमधील नागरिकांनी तेथील योगी सरकारचा संविधानिक मार्गाने एनकाऊंटर करून, दलितांवर अत्याचाराच्या प्रमाणात अग्रेसर असणार्‍या सरकारच्या जातीयवादी षडयंत्रांना सुरुंग लावला पाहिजे व हे सरकार बरखास्त करून त्याठिकाणी राष्ट्रपती राजवट लागु केली पाहिजे. योगी सरकारने SIT स्थापन करण्याच ढोंग बंद करावे. पिढीत युवतीने आरोपींची नावे व घडलेले कृत्य स्वतः कथन केले आहे. त्याचे विडियो उपलब्ध आहेत. त्या आधारावर आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी लढा यूथ मूव्हमेंटचे प्रमुख प्रमोद क्षिरसागर यांनी व्यक्त केली.


यावेळी पिढीत भगिनी मनीषा वाल्मिकी हिला मेणबत्ती प्रज्वलित करून श्रद्धांजली अर्पण केली. सदरील ठिकाणी लढा यूथ मूव्हमेंटचे प्रमुख प्रमोद क्षिरसागर, राष्ट्रतेज सवई, भैय्यासाहेब ठोकळ, अमित गोरे, धम्मादादा क्षिरसागर, पंकज धेंडे, मेघाताई आठवले, बापू कांबळे, रमेश शिरसाठ अविनाश शिंदे, सनी पवार, सतीश कदम, राहुल बनसोडे, भूषण अहिरे, संदीप माने, आप्पा कांबळे, सिद्धार्थ मोरे, विष्णु राठोड, किरण गंडले, समाधान कांबळे, राकेश माने, गौतम कांबळे, आकाश चव्हाण आदी उपस्थित होते.