मुंबई-ठाणे शिधावाटप क्षेत्रात मोफत डाळीचे वाटप सुरू


मुंबई : प्रधानमंत्री  गरीब कल्याण अन्न  योजनेअंतर्गत राष्ट्रीय अन्न योजनेतील (NFSA) अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना प्रतिशिधापत्रिका प्रतिमहा एक किलो डाळ या परिमाणात (तूरडाळ व चणाडाळ या दोन्हीपैकी एक डाळ एक किलो या कमाल मर्यादेत) मोफत डाळीचे माहे जुलै 2020 व माहे ऑगस्ट 2020 या महिन्याकरीता वितरण सुरू करण्यात आले आहे. ही  योजना  माहे नोव्हेंबर, 2020 पर्यंत सुरु राहणार असल्याची माहिती शिधावाटप नियंत्रक व नागरी पुरवठा मुंबईचे संचालक कैलास पगारे यांनी दिली.


प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील (NFSA) अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना नियमित अन्नधान्याच्या वाटपानंतर प्रतिमाणसी तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ असे एकूण पाच किलो मोफत अन्नधान्याचे माहे जुलै 2020 या महिन्याचे वाटप पूर्ण करण्यात आलेले आहे. तसेच माहे ऑगस्ट 2020 या महिन्याचे वाटप सुरु आहे.


डाळीचा मुबलक साठा उपलब्ध असल्यामुळे पात्र शिधापत्रिकाधारकांनी संबंधित अधिकृत शिधावाटप दुकानांतून गर्दी न करता फिजिकल डिस्टन्सिंगचा वापर करुन तसेच मास्कचा वापर करुन लवकरात लवकर डाळ प्राप्त करुन घ्यावी. असे आवाहनही करण्यात आले  आहे.


Popular posts
नाशिक फाटा ते मोशी परिपूर्ण राष्ट्रीय महामार्ग अखेर दृष्टीक्षेपात !
Image
अधिसंख्य पदावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नोकरीबाबत मंत्रीमंडळ उपसमितीची बैठक संपन्न
Image
महिला आणि मुलींच्या न्याय व हक्कांसाठी गावोगावी जनजागृती, सौहार्दवाढीचे कार्यक्रम राबविण्यात यावेत
Image
दरदिवशी होणाऱ्या कोविड मृत्यूंपैकी 71% मृत्यू हे दिल्ली , महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, हरीयाणा, पंजाब, केरळ, उत्तर प्रदेश आणि राजस्थान या आठ राज्ये/केंद्रशासित प्रदेशांत, 22 राज्ये/केंद्रशासित प्रदेशात मृत्यू दर राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी
Image
कॅटरिंग ब्रँड फीस्टलीचा मुंबईत प्रवेश
Image