शरद पवार यांना काँग्रेसचे अध्यक्ष कारावे - रामदास आठवले


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काँग्रेस पक्षाचं अध्यक्षपद स्वीकारायला सध्या राहुल गांधी तयार नाहीत. सोनिया गांधीही अध्यक्षपद सांभाळायला तयार नाहीत. त्यामुळे मूळ काँग्रेसचे असणारे ज्येष्ठ नेते शरद पवार, यांना काँग्रेसचे अध्यक्ष करावं, असं आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काँग्रेसला केलं आहे.

तसंच शरद पवार यांनी त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करावा. सध्या काँग्रेसला सक्षम  नेतृत्व नसल्यामुळे काँग्रेसचं पानिपत झालं आहे,असंही ते म्हणाले.