जवानांच्या पाठीशी संपूर्ण देश उभा आहे, असा संदेश संसदेच्या माध्यमातून दिला जाईल असा प्रधानमंत्र्याना विश्वास


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अधिवेशानाच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी संसद भवनाच्या प्रांगणात माध्यमांच्या प्रतिनिधींसमोर आपलं मनोगत व्यक्त केलं.

आपले जवान देशाच्या संरक्षणासाठी आपल्या प्राणांचीही पर्वा न करता कर्तव्य बजावत आहेत; या जवानांच्या पाठीशी संपूर्ण देश उभा आहे, असा संदेश संसदेच्या माध्यमातून दिला जाईल असा विश्वास  त्यांनी यावेळी व्यक्त केला.

"जब तक दवाई नाही तब तक ढिलाई नाही" असं सांगून जोपर्यंत कोरोनावरची लस येत नाही तोपर्यंत नियमात चालढकल करून चालणार नाही असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.