<no title>


ग्राहकांना वाहन भाड्याने देण्याची सुलभ सुविधा देणार


मुंबई : ओकिनावा या भारतीय इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपनीने ग्राहकांना इलेक्ट्रिक दुचाकीचे मालक बनण्याकरिता लवचिक भाडे पर्याय देण्यासाठी ओटीओ कॅपिटलसोबत सहयोग केला आहे. भाडेतत्त्वाचा कालावधी १२ महिने ते ३६ महिन्यांपर्यंत असू शकतो. बेंगळुरू व पुणे येथील ओकिनावा डिलरशिप्समध्ये ही सुविधा उपलब्ध असणार आहे आणि आगामी महिन्यांमध्ये भारतभरात विस्तारित करण्यात येईल. ही सुविधा ओकिनावाच्या ऑनलाइन व्यासपीठाच्या माध्यमातून वाहनाची बुकिंग करणा-या ग्राहकांसाठी देखील लाभदायी आहे. ते आता त्‍यांच्या घरामधूनच सुरक्षितपणे व आरामशीरपणे स्थिर वित्तपुरवठा पर्यायाचा सुलभपणे लाभ घेऊ शकतात.


या सहयोगांतर्गत ग्राहक किमान १२ महिन्यांसाठी ओकिनावा वेईकल भाडेतत्त्वावर घेऊ शकतात. या कालावधीनंतर ते विविध स्टाइल व रचनेमधील इतर कोणत्याही मॉडेलमध्ये अद्ययावत करण्याचा अतिरिक्त लाभ घेऊ शकतात. हा सहयोग ग्राहकांना इतर फायनान्सिंग पर्यायांच्या तुलनेत ओटीओ ओनरशिप मासिक हफ्ते भरत दर महिन्याला जवळपास ३० टक्क्यांपर्यंत बचत करण्यामध्ये मदत करेल.


ओकिनावाचे व्यवस्थापकीय संचालक व संस्थापक श्री. जीतेंदर शर्मा म्‍हणाले, "लॉकडाऊन शिथिलतेनंतर ओकिनावाने दुचाकीच्या मागणीमध्ये वाढ पहिली आहे. कोविड-१९ प्रादुर्भावानंतर लोक प्रवासासाठी सार्वजनिक परिवहन टाळत आहेत आणि वैयक्तिक वाहनांचा  अवलंब करत आहेत. यामुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. शासनाने देखील ग्राहकांसाठी इलेक्ट्रिक वाहने किफायतशीर दरामध्ये उपलब्ध होण्याकरिता नवीन धोरणे सादर केली आहेत. ओकिनावाचा ओटीओ कॅपिटलसोबतचा सहयोग हे याच दिशेने कंपनीने उचललेले आणखी एक पाऊल आहे. ई-मोबिलिटीचे मोठे ध्येय संपादित करण्यासाठी उद्योगक्षेत्रातील कंपन्या व सरकारसोबत सहयोग काम करणे हा यामागील मुख्‍य उद्देश आहे."


Popular posts
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांकरिता आरक्षण विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image