जपानमध्ये पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून योशिहीदे सुगा याचं नाव निश्चित


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जपानमध्ये लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी नं पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून मुख्य कॅबिनेट सचिव योशिहीदे सुगा यांचं नाव निश्चित केलं आहे. पंतप्रधान शिंझो अॅबे यांनी राजीनामा दिल्यामुळे आज नव्या नेतानिवडीची प्रक्रिया झाली. यावेळी योशिहीदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.