गोदावरी नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा


मुंबई (वृत्तसंस्था) : बीड जिल्ह्यातलं जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेनं भरलं असून धरणातून १५ हजार क्युसेक्सपेक्षा जास्त पाण्याचा विसर्ग गोदावरी नदी पात्रात सुरु आहे.

  त्यामुळे काल गेवराई तालुक्यातल्या श्रीक्षेत्र राक्षसभुवन इथल्या शनी-मंदिरात पाणी शिरलं.  गोदावरी नदी काठच्या गावांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला आहे.