पूर्व विदर्भातील जिल्ह्यात गेल्या महिन्यात उद्भवलेल्या पूरस्थितीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्राचं पथक दाखल


मुंबई (वृत्तसंस्था) : पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदीया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात गेल्या महिन्यात उद्भवलेल्या पूरस्थितीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारे वरीष्ठ संनदी अधिकारी रमेश कुमार गंटा यांच्या नेतृत्वातील सहा सदस्यीय पथक आज नागपुर इथं दाखल झालं आहे.

या संदर्भात आज नागपूरच्या विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. त्यानंतर पथक आज नागपूर आणि चंद्रपूर तसंच उद्या भंडारा, गोंदीया आणि गडचिरोली जिल्ह्यातल्या पुरग्रस्त भागाची पाहणी करणार आहे.