अभिनेत्री कंगना रानौतनं महानगरपालिकेकडून दोन कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची केली मागणी


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अभिनेत्री कंगना रानौत हिनं मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या सुधारित याचिकेत मुंबई महानगरपालिकेकडून दोन कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी केली आहे. कंगनाच्या पाली हिल इथल्या कार्यालयाचं बेकायदेशीर बांधकाम तोडण्याची कारवाई पालिकेनं केली होती.

त्या विरोधात तिनं ही याचिका दाखल केली आहे. कंगनानं  २०१८ साली महानगरपालिकेच्या परवानगी नंतरच बांधकाम केलं होतं असा दावाही याचिकेत केला आहे.