अभिनेत्री कंगणा राणावतला कोणी विरोध करण्याचा प्रयत्न केला तर रिपब्लिकन पक्ष कंगना राणावतला संरक्षण देणार - रामदास आठवले


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अभिनेत्री कंगणा राणावतला कोणी विरोध करण्याचा प्रयत्न केला तर रिपब्लिकन पक्ष कंगना राणावतला संरक्षण देईल, असं पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

कंगणा राणावत हीनं अलिकडेच मुंबईबाबत ट्विटरवरून व्यक्त केलेल्या मतांवरून तीच्या विरोधात होत असलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर आठवले यांनी आपली भूमिका मांडली.

लोकशाहीत प्रत्येकाला टीका करण्याचा अधिकार आहे. टीका केली म्हणून तिला मुंबईत राहण्याचा अधिकार नाही अशी भूमिका घेणं लोकशाहीविरोधी आहे असंही आठवले यांनी म्हटलं आहे.