इटालियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात राफेल नादाल पराभूत


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या राफेल नादाल याचा इटालियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या उपान्त्यपूर्व फेरीतील त्याच्या पहिल्याच सामन्यात १५ व्या मानांकित दिएगो श्वार्टझमननं सहजगत्या पराभव केला.

नादालची यापूर्वी नऊ वेळा श्वार्टझमनशी लढत झाली होती, त्यापैकी एकही सामना त्यानं गमावला नव्हता. मात्र सात महिन्यानंतर नादालनं खेळलेल्या या पहिल्याच सामन्यात मात्र त्याला हार पत्करावी लागली. लॉकडाऊनच्या दोन महिन्यात आपण टेनिस रॅकेटला स्पर्शदेखील केला नव्हता, असं नादालनं सांगितलं.