पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्र संधीचा भंग


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाकिस्तानी लष्करान काल जम्मू काश्मीरच्या पूंच जिल्ह्यातील देग्वार आणि मालती सेक्टर मध्ये पुन्हा शस्त्र संधीचा भंग करीत गोळीबार केला.

  त्यांनी भारतीय हद्दीत प्रत्यक्ष ताबा रेषे नजीक तोफगोळ्यांचा मारही केल्याच वृत्त आहे. त्याला भारतीय जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिल.

  यात जीवितहानी झाल्याचं मात्र वृत्त नाही. रात्री उशिरा पर्यंत ही चकमक सुरु होती.