२०२३ पर्यंत भारत खत आणि रसायन उत्पादनामध्ये स्वयंपूर्ण होईल - डी. व्ही. सदानंद गौडा


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येत्या २०२३ पर्यंत भारत खत आणि रसायन उत्पादनामध्ये स्वयंपूर्ण होईल, असा विश्वास केंद्रीय खत आणि रसायनं मंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांनी व्यक्त केला आहे. आत्मनिर्भर भारत कार्यक्रमातर्गत ४० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करून देशात विविध ठिकाणी खत उत्पादन प्रकल्प सुरु करण्यात आले असल्याचं त्यांनी आज सकाळी आत्मनिर्भर भारत आणि शाश्वत शेती या विषयावरील वेबिनारमध्ये दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाल्यावर सांगितलं.

देशातील ४ युरिया उत्पादन प्रकल्प अधिक सक्षम करण्यासाठी त्यांचं नुकतंच नूतनीकरण करण्यात आलं असून यापुढे सेंद्रिय खातानिर्मितीला प्राधान्य देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

त्यांच्या किमती इतर खतांपेक्षा २५ ते ३० टक्क्यांनी कमी असतील आणि त्यापासून १८ ते ३० टक्के उत्पादन जास्त मिळेल, अशी ते म्हणाले.