रिझर्व्ह बँकेनं पतधोरण समितीची बैठक पुढे ढकलली


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रिझर्व्ह बँकेनं उद्यापासून सुरु होणारी पतधोरण समितीची बैठक पुढे ढकलली असून, बैठकीची नवीन तारीख लवकरच कळवली जाईल, असं प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केलं आहे. चौथं द्वैमासिक पतधोरण ठरवण्यासाठी ही बैठक उद्यापासून तीन दिवस चालणार होती.