सिक्कीम पर्यटन १० ऑक्टोबरपासून सुरू


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सिक्कीम सरकारनं पर्यटनाशी संबंधित सर्व व्यावसायिकांना त्यांचे व्यवसाय येत्या १० ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिली आहे.

सिक्किम सरकारच्या सूत्रांनी काल ही माहिती दिली. सिक्किममधली हॉटेल्स तसंच इतर पर्यटन व्यावसायिकांसाठीची सर्वसाधारण कार्यप्रणाली लवकरच जाहीर होणं अपेक्षित आहे.

हॉटेल्स तसंच घरगुती निवासाची आरक्षण  येत्या २७ सप्टेंबरपासून सुरू होतील, असंही या सूत्रांनी सांगितलं.