जम्मू - काश्मीरमध्ये सैन्य दलाची दहशतवाद्यांबरोबर चकमक


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राजौरी जिल्ह्यातील नौशेरा, केरी भागात आज पहाटेच्या सुमारास पाकिस्तानी सैन्यानं पुन्हा एकदा नियंत्रण रेषेचं उल्लंघन करीत अंदाधुंद गोळीबार केला. भारतीय सैन्यानं त्याला चोख प्रत्युत्तर दिलं असून अद्याप चकमक सुरु आहे. यामध्ये पंजाब रेजिमेंटचा एक जवान शहीद झाला असल्याचं लष्करी सूत्रांनी म्हटलं आहे.

पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारात हा जवान जखमी झाल्यानं त्याला तातडीनं लष्करी रुग्णालयात हलविण्यात आलं, मात्र तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या वर्षात १७९३ वेळा पाकिस्तानी सैन्यानं जम्मू काश्मीर भागात नियंत्रण रेषेचं उल्लंघन केलं आहे.

दरम्यान, जम्मू काश्मीरमध्ये बडगाम भागातूनही आज सकाळी सुरक्षा दलांनी चार दहशतवाद्यांना अटक केली. त्यांच्याकडून हत्यारं आणि दारुगोळा हस्तगत करण्यात आला असून अधिक तपशिलाची प्रतीक्षा आहे. 


Popular posts
नाशिक फाटा ते मोशी परिपूर्ण राष्ट्रीय महामार्ग अखेर दृष्टीक्षेपात !
Image
अधिसंख्य पदावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नोकरीबाबत मंत्रीमंडळ उपसमितीची बैठक संपन्न
Image
महिला आणि मुलींच्या न्याय व हक्कांसाठी गावोगावी जनजागृती, सौहार्दवाढीचे कार्यक्रम राबविण्यात यावेत
Image
दरदिवशी होणाऱ्या कोविड मृत्यूंपैकी 71% मृत्यू हे दिल्ली , महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, हरीयाणा, पंजाब, केरळ, उत्तर प्रदेश आणि राजस्थान या आठ राज्ये/केंद्रशासित प्रदेशांत, 22 राज्ये/केंद्रशासित प्रदेशात मृत्यू दर राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी
Image
पंतप्रधानांनी ‘आरंभ’ या एकात्मिक मुलभूत अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या भागातील भारतीय नागरी सेवेच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांशी साधला संवाद