पंतप्रधानांनी माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांच्या निधनाबाबत व्यक्त केला शोक


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधानांनी माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला आहे.


पंतप्रधान म्हणाले," जसवंत सिंहजींनी प्रथम सैनिक म्हणून आणि त्यानंतर त्यांच्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत देशाची तत्परतेने सेवा केली. अटलजींच्या सरकारात त्यांनी महत्त्वाची खाती सांभाळली आणि अर्थ, संरक्षण आणि परराष्ट्र व्यवहार अशा क्षेत्रांत आपला ठसा उमटवला.मला त्यांच्या निधनाने दु:ख झाले आहे."


पंतप्रधान पुढे म्हणाले, "राजकीय आणि सामाजिक अशा विविध विषयांवरील वैशिष्ट्यपूर्ण दृष्टिकोनासाठी जसवंतजी आपल्या स्मरणात राहतील. मला आमच्या चर्चांची नेहमीच आठवण येईल. त्यांच्या कुटुंबियांचे  आणि समर्थंकांचे मी सांत्वन करतो.ओम शांती."


पंतप्रधानांनी मानवेंद्र सिंग यांच्याशीसुद्धा बोलून जसवंत सिंहजी यांच्या दुर्दैवी निधनाबद्दल शोक व्यक्त केला.