झानाडू रिअँलिटीचा प्रकल्प; २५०० चौरस फुटांचे प्लॉट्स ९.९० लाखांत उपलब्ध
मुंबई : झानाडू रिअँलिटी या अग्रगण्य रिअँलिटी प्लॅटफॉर्मने ब्लिस (ब्रँड लँड इन्व्हेस्टमेंट स्टॉक्स स्कीम) हा प्रकल्प सादर केला असून याअंतर्गत ग्राहकांना भारताच्या एकमेव किनारपट्टीवरील हिल स्टेशन असलेल्या दापोली येथे नयनरम्य रहिवासी समुदायात लाइफस्टाइल प्लॉट्स खरेदी करुणायची सुवर्णसंधी मिळणार आहे. २५०० चौरस फुटांचे प्लॉट्स ९.९० लाख रुपये किंमतीला असून ग्राहक पहिल्या रकमेवर सहजपणे प्री-बुक करू शकतात.
पुणे आणि मुंबईवरून फक्त ५ तासांच्या अंतरावर असलेले दापोली हे कोकण किनारपट्टीवर वसलेले आहे. कोकण किना-यावरील अलिबागनंतरचे हे मोठे पर्यटन स्थळ म्हणून विकसित होईल, असा अंदाज आहे. या प्रकल्पाच्या सुविधांमध्ये समुद्राच्या बाजूला क्युरेटेड लँड पार्सल, प्लॉट सहजपणे अधिग्रहित करण्यासाठी जमीन प्री-कट व पॅकेजिंग, वीज, रस्ते, पाणी या सर्व खात्रीशीर पायाभूत सुविधा, जागतिक पातळीवरील सुविधांसह संकल्पना आधारीत विकास, मालकीच्या कागदपत्रांत वैयक्तिक सात/बारा, एनकम्ब्रन्स सर्टिफिकेट आदींचा समावेश आहे.
झानाडू रिअँलिटीचे संचालक श्री सॅम्युज्वल घोष म्हणाले, “भारतात ग्राहकांदरम्यान जमीन खरेदीचे लोकशाहीकरण करणे, हा आमचा उद्देश आहे. जमीन मालकीतील सर्व अडथळे दूर करत भारतातील सर्वात सुरक्षित मालमत्ता आणण्याचे आम्ही ठरवले आणि हे ब्लिस या कोडनेमद्वारे या योजनेची सुरुवात केली. योजनेअंतर्गत, या पातळीवरील विकासात गुंतवणूक करण्याची दुर्मिळ संधी दिली जात आहे.”
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.