माझं कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेत राज्यातल्या ८ कोटींपेक्षा जास्त लोकांचं आरोग्य सर्वेक्षण पूर्ण


मुंबई (वृत्तसंस्था) : माझं कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेत राज्यातल्या ३४ जिल्ह्यांमधल्या ग्रामीण भागात ८ कोटींपेक्षा जास्त लोकांचं आरोग्य सर्वेक्षण झालं आहे. सुमारे २४ लाख कुटुंबाना आरोग्य पथकांनी भेटी दिल्या असल्याचं ग्रामविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अरविंद कुमार यांनी सांगितलं. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या मोहिमेच्या जिल्हा परिषदामार्फत होत असलेल्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. त्यात त्यांनी ही माहीती दिली.

जिल्हा परिषदांना १ कोटी ८४ लाख कुटुंबाना भेट देण्याचं उद्दिष्टं जिल्हा परिषदाना   दिलं आहे. यात सारी आणि आयएलएसचे १५ हजार ३९२ रुग्ण, तर कोरोनाचे ६ हजार ९३८ रुग्ण आढळले. सहव्याधी असलेले २ लाख ६ हजार २११ व्यक्ती आढळल्या.