भारतात आजपर्यंत सुमारे 5 कोटी कोविड चाचण्या


गेल्या दोन आठवड्यात 1.33 कोटी कोविड चाचण्या


नवी दिल्‍ली : भारत जगातील काही मोजक्या देशांपैकी एक आहे, जिथे दररोज मोठ्या प्रमाणात कोविड चाचण्या केल्या जात आहे. आता देशाची दररोज चाचण्यांची क्षमता 11.70 लाखांच्या पुढे गेली आहे.


भारतात आजवर झालेल्या एकूण चाचण्यांचा आकडा सुमारे पाच कोटी (4,95,51,507) इतका आहे . गेल्या 24 तासात देशात  7,20,362  चाचण्या करण्यात आल्या.


देशभरात चाचण्यांची गती आणि व्याप्ती वाढवल्यामुळे, केवळ गेल्या दोन आठवड्यात 1,33,33,904 चाचण्या करण्यात आल्या


व्यापक जागतिक संदर्भाच्या अनुषंगाने, केंद्रसरकारची धोरणे देखील सातत्याने सुधारली आत आहेत. जनतेला दिलासा देण्याच्या अनेक उपाययोजनांपैकी, एक म्हणजे देशात सर्व लोकांना चाचणी करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने अलीकडेच, आपल्या मार्गदर्शक तत्वांमध्ये सुधारणा करुन पहिल्यांदाच, ‘मागणीनुसार चाचणी’सुविधा देऊ केली आहे. राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनाही अधिकाधिक चाचण्या करण्यासाठी नियमांमध्ये बरीच लवचिकता आणि स्वातंत्र्य देण्यात आले आहे.


दररोज चाचण्या करण्याचा वेग सातत्याने वाढता असून, ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यापासून दररोज सात लाखांपर्यंत होणाऱ्या चाचण्यांची संख्या सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत प्रतिदिन/दहा लाख चाचण्या झाली आहे. 


अधिक चाचण्या केल्यामुळे कोविडचे रुग्ण लवकर ओळखता येत असून, त्यांच्यावर आणि विलगीकरण/ अथवा रुग्णायालात भरती करुन लवकरच उपचार सुरु करता येतात. या उपाययोजनांमुळे रुग्ण बरे होण्याचे आणि मृत्युदर कमी होण्याचे प्रमाण वाढत असून आपण अनेक लोकांना सुरक्षित ठेवू शकतो.


कोविड19 संदर्भात कुठलीही अधिकृत आणि ताजी आकडेवारी/माहिती हवी असल्यास, तसेच काही मार्गदर्शक तत्वे अथवा सूचना बघायच्या असल्यास, कृपया खालील संकेतस्थळाला भेट द्यावी  : https://www.mohfw.gov.in/.


तांत्रिक गोष्टींच्या माहितीसाठी संपर्क साधायचा असल्यास, या ईमेल आय डी वर साधावा: technicalquery.covid19@gov.in आणि इतर शंका/समस्यांसाठी ईमेल आयडी- ncov2019@gov.in .


कोविड19 संदर्भात इतर माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक (हेल्पलाईन): +91-11-23978046 or 1075 (Toll-free). सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या हेल्पलाईन्सची यादी सोबत जोडली आहे. https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf .