बहुप्रतिक्षित ग्लॉस्टरच्या प्रीमियम ऑफ-रोडिंग क्षमतांचे एमजीने केले लॉंचिंग
• महेश आनंदा लोंढे
मुंबई : एमजी मोटर इंडिया २०१९ पासून सातत्याने कुंपनांना ओलांडत अद्ययावत तंत्रज्ञान, प्रगत आणि भविष्यातील कार आणण्याचा पुढचा पल्ला गाठत आहे. कार ब्रँड बाजारात स्मार्ट उत्पादनासह कंपनीने सकारात्मक असे नवे वादळ आणले असून याचाच एक भाग म्हणून कंपनीने एमजी ग्लॉस्टरच्या रोडिंग कॅपेबिलीटी (क्षमता) चे लॉंचिंग केले आहे. एमजी ग्लॉस्टर फोरव्हिलर ड्राईव्हसोबत मार्केटमध्ये प्रवेश करत असून यात ड्राईव्ह मोड्स, रॉक सँड, मड आणि फाईव्ह लिंग इंटिग्रल रिअर सस्पेंशनच्या सुविधा देण्यात आल्या आहेत.
या कारमध्ये बॉर्ग वॉर्नर ट्रान्सफर केससह डिफरन्शनल लॉक बटणचीही यात सोय असणार आहे. प्राडो आणि पजेरो सारख्या रोडर्सचा प्रीमियमचा वारसा परत आणण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. एमजी ग्लॉस्टरच्या विशेषतांमध्ये फ्रंट कॉलिशन, ब्लाईंड स्पॉट मॉनिटर आणि ऑटो पार्क असिस्ट, अडेप्टिव्ह क्रूज़ कंट्रोल आणि लेन डिपार्औचर वॉर्निंग आदींचा समावेश आहे. फेब्रुवारीत ऑटो एक्स्पो २०२० मध्ये कार सर्वप्रथम लॉंच करण्यात आली होती.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.