रस्ता सुरक्षेच्या प्रसाराकरीता 15 सप्टेंबर रोजी वेबीनारद्वारे चर्चासत्राचे आयोजन


पुणे : महाविद्यालयीन युवकांमध्ये रस्ता सुरक्षेचा प्रसार करणे, त्यांच्यात रस्ता सुरक्षा संस्कृती रुजावी या उद्देशाने रस्ता सुरक्षा कक्ष परिवहन आयुक्त् कार्यालयाच्या तसेच असोसिएशन ऑफ प्लेसमेंट ऑफिसर्स ऑफ इंजिनिअरिंग ॲन्ड एसबीए कॉलेज यांच्या संयुक्त् विद्यमाने दि.15 सप्टेंबर 2020 रोजी दुपारी 03.30 ते 05.30 या कालावधीत वेबीनारद्वारे चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.


या चर्चासत्रात मोटार वाहन विभागाचे तज्ञ अधिकारी तसेच विविध रस्ता सुरक्षा संबंधित संस्थांचे पदाधिकारी, महाविद्यालयांचे प्राचार्य व प्लेसमेंटचे अधिकारी सहभागी होणार आहेत.


रस्ता सुरक्षेशी संबंधित सर्व विभाग, महाविद्यालयीन प्राचार्य व प्लेसमेंट अधिकारी, स्वयंसेवी संस्था, इच्छुक नागरीकांनी या चर्चासत्रामध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन मोटार वाहन विभागातर्फे करण्यात येत असल्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे यांनी कळविले आहे.


Popular posts
देशांतर्गत मागणीला प्रोत्साहन देण्यासाठी ७३ हजार कोटीची घोषणा
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
भ्रष्टाचार निर्मूलन आणि पारदर्शक प्रशासन याकरता सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
Image