राज्यांमधील वैद्यकीय ऑक्सिजनच्या दळणवळणावर कोणतेही बंधन घालू नये, असे केंद्रिय आरोग्य मंत्रालयाचे राज्य / केंद्रशासित प्रदेशांना निवेदन
• महेश आनंदा लोंढे
प्रत्येक रुग्णालयात दाखल केलेल्या कोविड रुग्णाला ऑक्सिजन मिळेल याची खात्री करण्यासाठी राज्ये / केंद्रशासित प्रदेशांना जबाबदार धरले जाणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रिय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, काही अधिनियमांतर्गत तरतूदींचा उपयोग करून ऑक्सिजन पुरवठ्याची आंतरराज्यीय वाहतूक रोखण्याचा प्रयत्न काही राज्य करीत आहेत, असे लक्षात आले आहे आणि राज्यात असलेल्या उत्पादकांना / पुरवठादारांना ऑक्सिजनचा पुरवठा केवळ राज्यातील रुग्णालयांपुरताच मर्यादित ठेवण्यास सांगण्यात येत आहे, असे लक्षात आले.
ही बाब लक्षात घेता, आरोग्य मंत्रालयाने कोविडमधील अत्यवस्थ रुग्णांच्या व्यवस्थापनासाठी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचे महत्त्व पुन्हा सांगितले आहे. केंद्रिय आरोग्य सचिवांना राज्य / केंद्रशासित प्रदेशांना लिहिलेल्या पत्रात यावर भर दिला आहे की, कोविड – 19 च्या मध्यम आणि गंभीर प्रकरणांच्या व्यवस्थापनासाठी वैद्यकीय ऑक्सिजनचा पुरेसा आणि अखंडित पुरवठा करणे ही एक महत्त्वपूर्ण आवश्यकता आहे.
आरोग्य सचिवांनी राज्य / केंद्रशासित प्रदेशांना आवाहन केले आहे की, या ठिकाणी वैद्यकीय ऑक्सिजनची वाहतूक करण्यावर कोणतीही बंधने लादण्यात येणार नाहीत, हे सुनिश्चित करावे. प्रत्येक रुग्णालयात दाखल असलेल्या कोविड रुग्णाला ऑक्सिजन मिळेल याची खात्री करणे ही प्रत्येक राज्याची जबाबदारी आहे याची कठोरपणे अंमलबजावणी केली गेली आहे.
हे पुन्हा त्यांच्या लक्षात आणून दिले आहे की वैद्यकीय ऑक्सिजन ही एक आवश्यक सार्वजनिक आरोग्य वस्तू आहे आणि देशातील वैद्यकीय ऑक्सिजनच्या पुरवठ्यात येणाऱ्या अडथळ्याचा इतर भागातील कोविड – 19 या आजाराने ग्रस्त रुग्णांच्या व्यवस्थापनावर गंभीर परिणाम होऊ शकतो. शिवाय, काही मोठ्या ऑक्सिजन उत्पादक / पुरवठादारांकडे आधीपासून विद्यमान पुरवठा करार असून त्या कराराची पूर्तता करण्याचे कायदेशीर बंधन असलेल्या विविध राज्यांमधील रुग्णालये आहेत.
केंद्राच्या नेतृत्त्वाखाली कोविड व्यवस्थापनाची रणनिती उपचारांच्या मार्गदर्शक तत्वांच्या मानकांवर आधारित आहे. या मार्गदर्शक तत्त्वांनी रुग्णालयांसह सर्व कोविड सुविधांमध्ये वैद्यकीय सेवेची एकसमान आणि प्रमाणित गुणवत्ता सुनिश्चित करण्यात आली आहे. मध्यम आणि गंभीर रुग्णांसाठी पुरेसा ऑक्सिजन पुरवठा, अँटी कॉग्युलन्ट्सचे योग्य आणि वेळेवर प्रशासन आणि मोठ्या प्रमाणात उपलब्धता आणि स्वस्त, कार्टिकोस्टेरॉइट्स हे नियमानुसार कोविड – 19 थेरपीचा मुख्य आधार मानले जाऊ शकतात.
देशभर ऑक्सिजनच्या पुरेशा पुरवठ्यामुळे इतर उपायांसह एकत्रित रुग्णालयात दाखल मध्यम आणि गंभीर रुग्णांचे प्रभावी निदान करणे सक्षम झाले आहे. योग्य रणनितीचे धोरण स्वीकारल्यामुळे वाढत्या सक्रीय रुग्णांचा बरे होण्याचा दर आणि रुग्णांच्या मृत्यूचा दर (सध्या 1.67%) घटत आहे. आजपर्यंत 3.6 टक्के पेक्षा कमी सक्रीय रुग्ण ऑक्सिजन सहाय्यावर आहेत.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.