प्रधानमंत्र्यांनी रॉकी या पोलीस श्वानाला दिली आदरांजली


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमात बीड इथल्या पोलीस दलात शहीद  झालेल्या रॉकी या श्वान सेनानीच्या कार्याबद्दल कौतुकास्पद उद्गार काढून त्याला आदरांजली अर्पण केली. प्रधानमंत्र्यांनी गांभीर्याने दखल घेतल्यानं बीड जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी त्यांचे मनापासून आभार व्यक्त केले. 

बीड पोलीस दलातल्या डॉग स्क्वॉड मध्ये काम करणाऱ्या रॉकी या श्वानाचं नुकतच 15 ऑगस्टला निधन झालं, त्यावेळी त्याच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले होते. पोलिसांच्या सेवेत असताना रॉकीने 356 गुन्हे उघडकीस आणले होते. याशिवाय देशपातळीवर विविध स्पर्धांमधे भाग घेऊन बीड पोलिसांना त्यानं अनेक पदकही मिळवून दिली होती.