कोकणातल्या सागरी मच्छीमारांसाठी राज्य शासनानं मदतीचं पॅकेज केलं जाहीर


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोकणातल्या सातही जिल्ह्यांमधल्या ५५ हजार सागरी मच्छीमारांसाठी राज्य शासनानं ६० कोटी रुपयांच्या मदतीचं पॅकेज जाहीर केलं आहे. अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज ऑनलाइन पत्रकार परिषदेत दिली.

निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीसाठी यापूर्वीच नियमित नियमांपेक्षा अडीच पट भरपाई देण्यात आली आहे. त्यापूर्वी झालेली क्यार आणि महा ही चक्रीवादळं तसंच करोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर नवं पॅकेज जाहीर करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.