श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहिहंडी उत्सवानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून शुभेच्छा


मुंबई : श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि दहिहंडी उत्सवानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या असून कोरोनाच्या पार्श्वभूमिवर नियम पाळून सुरक्षितपणे सण साजरे करण्याचे आवाहन केले आहे.


उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणातात की, समाजातील अपप्रवृत्तींचा विनाश करण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी जन्म घेतला. भगवान श्रीकृष्णांचा आदर्श ठेवून आपणही वाईट प्रवृत्तींविरोधात ठामपणे उभं राहिलं पाहिजे. वाईट विचारांना तिलांजली दिली पाहिजे. समाजासाठी विनाशकारी ठरणारी गोष्ट नष्ट करण्याचं काम भगवान श्रीकृष्णांनी केलं. आधुनिक काळात विनाशकारी कोरोनाला संपवण्याचा संकल्प श्रीकृष्ण जयंतीच्या निमित्तानं आपण करुया. आपणा सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि दहिहंडी उत्सवाच्या मनापासून शुभेच्छा.


Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘स्वीप’ उपक्रमांवर भर द्यावा - जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
Image