"जनतेला स्वतःच कुलुपे तोडायला भाग पाडू नका' भाजपा शहराध्यक्ष श्री. जगदीश मुळीक यांचा सरकारला इशारा!


पुणे : "महाराष्ट्रातील मंदिरे आणि सर्व धर्मस्थानांचे दरवाजे सर्व नागरिकांसाठी उघडावे" या मागणीसाठी महाराष्ट्रातल्या विविध धार्मिक संस्था आणि प्रमुख देवस्थानांच्या वतीने दि. २९ ऑगस्ट रोजी घंटानाद आंदोलन करण्यात आले. भारतीय जनता पार्टी पुणे पुणे शहराच्या वतीने या आंदोलनात सक्रिय सहभाग घेऊन दोनशेच्या पेक्षा जास्त धर्मस्थळा समोर भाजपाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी घंटानाद आंदोलन केले. "मद्यालय खुली आणि देवालय बंद" या ठाकरे सरकारच्या अत्यंत जुलमी कार्यपद्धतीवर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आजच्या आंदोलनातून तीव्र रोष व्यक्त केला.

पुणे शहर भाजपा अध्यक्ष श्री जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली पर्वती मतदार संघातील सारसबाग सिद्धिविनायक मंदिरासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी ठाकरे सरकारला जाग यावी आणि देवालय सुरू करण्याची बुद्धी या सरकारला मिळावी म्हणून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते शाहीर श्रीकांत रेणके आणि त्यांचे सहकारी यांनी गोंधळ सादर केला.

सर्व धर्मस्थळे नागरिकांसाठी ताबडतोब खुली करावीत अशी मागणी श्री जगदीश मुळीक यांनी यावेळी केली. अन्यथा सर्वसामान्य पुणेकर नागरिकांच्या हितासाठी आम्हाला यापुढे अजून प्रखर आंदोलन उभे करावे लागेल. तसेच सर्वसामान्य जनतेच्या संयमाची परीक्षा ठाकरे सरकारने घ्यायचा प्रयत्न करू नये. जनतेचा धीर सुटला तर जनता स्वतः मंदिरे व सर्व धर्मस्थानांची कुलपे तोडायला उद्युक्त होईल असा इशारा श्री जगदीश मुळीक यांनी दिला.

यावेळी महापौर श्री मुरलीधर मोहोळ, आमदार माधुरी ताई मिसाळ, आमदार सुनील कांबळे, उपमहापौर सरस्वती ताई शेंडगे, माजी मंत्री दिलीप कांबळे, पुणे शहर सरचिटणीस श्री राजेश पांडे, श्री गणेश घोष, श्री राजेश येनपुरे आणि भारतीय जनता पार्टीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

पुणे शहर खासदार श्री गिरीश बापट, आमदार मुक्ताताई टिळक आणि स्थायी समिती अध्यक्ष श्री हेमंत रासने हे ओमकारेश्वर मंदिर, आमदार श्री सुनील कांबळे हे वानवडी येथील विठ्ठल मंदिर, आमदार सिद्धार्थ शिरोळे हे कमला नेहरू पार्क जवळील दत्त मंदिर, आमदार श्री भीमराव तापकीर हे धनकवडी ग्रामदैवत जानुबाई देवी मंदिर येथील आंदोलनांमध्ये हजारो कार्यकर्त्यांसह सहभागी झाले होते.

पुणे शहरात दोनशेच्यावर मंदिरे व धर्मस्थान समोर झालेल्या आंदोलनात भारतीय जनता पार्टीचे शहरातील सर्व पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते.  


Popular posts
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image