उत्तर प्रदेशमध्ये रक्षाबंधन साजरा करण्यासाठी मोफत प्रवास


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उद्या रक्षाबंधन आहे. त्यानिमित्त उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील महिलांसाठी उद्या मोफत प्रवासाची घोषणा केली आहे.

उत्तर प्रदेश परिवहन महामंडळाच्या कोणत्याही गाडीमधून उद्या महिलांना हा सण  साजरा करण्यासाठी मोफत प्रवास करता येणार आहे. आज मध्यरात्रीपासून उद्या मध्यरात्रीपर्यंत ही सवलत असेल.

आर्थिक अडचणीमुळे आपल्या नातेवाईकांना भेटायला जाऊ न शकणाऱ्या महिलांना ते शक्य व्हावं, यासाठी  ही सवलत गेली तीन वर्ष दिली जात आहे.

मात्र, प्रवास करतानाही सर्व भगिनींनी कोविडमुळे उद्भवलेली गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन शारीरिक आंतर, मास्कचा वापर आदी नियमांचं पालन करावं, असं आवाहन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलं आहे.


Popular posts
नाशिक फाटा ते मोशी परिपूर्ण राष्ट्रीय महामार्ग अखेर दृष्टीक्षेपात !
Image
अधिसंख्य पदावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नोकरीबाबत मंत्रीमंडळ उपसमितीची बैठक संपन्न
Image
कर्ज घेऊन व्यवसाय यशस्वी करणाऱ्या तरुणांची कोरोना संकटग्रस्तांना मदत
Image
पंतप्रधानांनी ‘आरंभ’ या एकात्मिक मुलभूत अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या भागातील भारतीय नागरी सेवेच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांशी साधला संवाद
अन्न चाचणी प्रयोगशाळेतील रिक्तपदांसाठी लवकरच पदभरती - अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे
Image